Attack On Army Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान शहीद झाले.एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचं चकमकीत रूपांतर झालं. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. श्रीनगरस्थित लष्कराच्या चिनार कॉर्प्सनं एका ट्विटमध्ये म्हटलंय, 'कुलगाममधील हलानच्या उंच भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी 4 ऑगस्ट रोजी कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि उपचारादरम्यान ते शहीद झाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola