Assam Boat Accident : ब्रम्हपुत्रा नदीत दोन बोटी एकमेकांना धडकल्या, 50 हून अधिक प्रवासी बेपत्ता

आसाममधून एक धक्कादायक बातमी. ब्रम्हपुत्रा नदीमध्ये दोन बोटींची एकमेकांना धडक बसली असून या अपघातानंतर 50 हून अधिकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. जोरहाट जिल्ह्यातून वाहणाऱ्या ब्रम्हपुत्रेच्या पात्रात एका मोठ्या बोटीनं स्टिमर प्रकारच्या बोटीला धडक दिली. दुर्घटनाग्रस्त बोटीत एकूण 120 प्रवासी होते. स्थानिक यंत्रणांनी बचावकार्य सुरु केलं आहे. काही लोकांना वाचवण्यात यश आलं असून अनेकांचा शोध सुरु आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola