Asia Cup 2022 India vs Pakistan : विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Aug 2022 08:09 PM (IST)
युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज रोहित शर्माच्या टीम इंडियाचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. बाबर आझमच्या पाकिस्तानी फौजेनं टीम इंडियाचं विश्वचषकातलं निर्विवाद वर्चस्व मोडून काढलं, त्याला जेमतेम दहा महिने उलटलेयत. योगायोगाची गोष्ट म्हणजे बाबर आझमच्या फौजेनं तो ऐतिहासिक विजय मिळवला, त्याच मैदानात आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येत आहेत