Asaduddin Owaisi Car Firing : असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार, एक हल्लेखोर ताब्यात

नवी दिल्ली: एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशातील मेरठजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या गाडीवर एकूण चार राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये असदुद्दीन ओवेसींना कोणतीही हानी झाली नसून ते सुखरुप असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. 

मेरठवरुन परत येत असताना आपल्या गाडीवर चार राऊंड फायर झाल्याचा दावा खासदार असदुद्दीन ओवेसींनी केला आहे. त्यानंतर आपली गाडी पंक्चर झाली आणि आपण दुसऱ्या गाडीच्या मदतीने त्या ठिकाणाहून निघाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola