Arvind Kejriwal on Gujarat Election : गुजरातमध्ये आपचंच सरकार येणार : अरविंद केजरीवाल
abp majha web team
Updated at:
13 Sep 2022 09:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आपचीच सत्ता येणार असं म्हटलंय. तसंच त्यांनी काँग्रेसबाबत बोलताना काँग्रेस संपलीय असं वक्तव्यही केलंय. गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. भाजपा सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची योजना आखत असल्याचा टोलाही केजरीवाल यांनी लगावलाय. आप गुजरातमधील सर्व जागा लढवणार आहे. वकील, ऑटोचालक, शेतकरी, व्यापाऱ्यांना भेटलो असता त्यांनी गुजरातमध्ये भ्रष्टाचार असल्याचं सांगितलं. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शासन दिलं जाईल असंही केजरीवाल म्हणालेत.