
Arvind Kejriwal Defeated : अरविंद केजरीवाल यांचा पराभव, 'आप'ला सर्वात मोठा धक्का! Delhi Result 2025
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश प्रवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या सुद्धा पराभवाच्या छायेत आहेत.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी त्यांचा 1200 मतांनी पराभव केला. केजरीवालांसारख्या राष्ट्रीय नेत्याचा पराभव करुन परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले आहेत. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. याठिकाणी त्यांच्यासमोर भाजपच्या परवेश वर्मा आणि काँग्रेसच्या संदीप दिक्षीत यांचे आव्हान होते.