Arunachal Pradesh : China कडून दोन युवकांच्या अपहरणाचा प्रयत्न, एक जण पळाल्यानं चीनच्या दुष्कृत्याचा पर्दाफाश
Continues below advertisement
Arunachal Pradesh : चीनने अरुणाचल प्रदेशातील 17 वर्षीय युवकाचं अपहरण केल्याचा आरोप खासदार तापिर गाओ यांनी केलाय. चीनच्या सैनिकांनी सिंयुगलातल्या लुंगता परिसरातून दोन मुलांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र एक जण चिनी सैनिकांच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच चीनच्या या कटाचा पर्दाफाश झाल्याची माहिती खासदार तापिर गाओंनी दिलीय. अल्पवयीन मुलाचं अपहरण नेमकं का करण्यात आलंय. तो सध्या सुरक्षित आहे की नाही याचा स्थानिक पोलीस तपास करताहेत. तसंच या संपू्र्ण प्रकरणासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Continues below advertisement