Nitish Kumar : अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचे एकमेव आमदार भाजपमध्ये, नितीश कुमारांना झटका

Continues below advertisement

भाजपनं अरुणाचल प्रदेशातील जेडीयूच्या एकमेव आमदाराला पक्षात प्रवेश देऊन नितीश कुमारांना झटका दिलाय. अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचे एकमेव आमदार टेची कासो यांनी नुकताच सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभेचे उपाध्यक्ष टेसम पोंगटे यांनी ईटानगरचे आमदार कासो यांचं भाजपतील प्रवेशासंदर्भातील पत्र स्वीकारलं आहे. याच बरोबर आता ६० सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत भाजपच्या सदस्यांची संख्या ४९ वर पोहोचलीय. अरुणाचल प्रदेशमधल्या जेडीयूच्या ७ पैकी ६ आमदारांनी डिसेंबर २०२० मध्येच भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर आता जेडीयूचा शेवटचा आमदार टेची कासो हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram