Ladakh : लडाखमध्ये शनिवारी लष्कराचं वाहन दरीत कोसळून 9 सैनिक शहीद
abp majha web team
Updated at:
20 Aug 2023 02:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलडाखमध्ये शनिवारी लष्कराचं वाहन दरीत कोसळून ९ सैनिक शहीद झाले. यामध्ये ८ जवान आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. लष्कराची ३४ जणांची टीम शनिवारी दुपारी कारू लष्करी तळावरून निघाली होती. ताफ्यात एकूण तीन वाहनं होती, ज्यामध्ये एक रुग्णवाहिका देखील होती. न्योमाजवळ आल्यावर ताफ्यातील एका गाडीचं टायर स्किड झालं, ज्यामुळे ही गाडी थेट दरीत कोसळली. यामध्ये ९ सैनिकांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जवान जखमी आहेत.