Andhra Pradesh Konaseema Flood : पुराची पाहणी करताना मंत्री पाण्यात कोसळले

 देशातल्या अनेक राज्यात पावसाचं आणि पुराचं थैमान आहे... या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनेक मंत्र्यांची फौज जात असते.. मात्र आंध्रप्रदेशच्या एका मंत्र्याला पूरस्थितीचा दौरा महागात पडला...आंध्रप्रदेशच्या कोनसीमा भागात आंध्रचे माजी मंत्री उमामहेश्वर राव आणि आमदार राधकृष्ण पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते.. मात्र बोटीतून उतरताना अचानक नेत्यांचा पाय घसरला आणि ते पुराच्या पाण्यात कोसळले. मंत्र्यांनी लाईफ जॅकेट घालण्यास नकार दिला होता.. त्यामुळे ते पाण्यात बुडायाला लागले होते मात्र  सुदैवानं तिथे उपस्थित मच्छिमारांनी त्वरित पाण्यात उडी घेत नेत्यांना पाण्याबाहेर काढलं... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola