Emergency | सत्तेसाठी एका कुटुंबाने देशाचा तुरुंग केला, आणीबाणीवरुन अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा
देशात 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. या आणीबाणीला 45 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणीबाणीवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी एका कुटुंबाने एका रात्रीत देशाचा तुरुंग केला, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.