Amit Shah Full Interview on ABP : ठाकरे - पवार; चव्हाण ते अजितदादा अमित शाहांचा स्फोटक Interview

Amit Shah Full Interview on ABP : ठाकरे - पवार; चव्हाण ते अजितदादा अमित शाहांचा स्फोटक Interview काँग्रेसने (Congress) वोट बँकेच्या राजकारणासाठी आरक्षणासोबत छेडछाड केली, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे. राहुल गांधी बेजबाबदार नेता आहेत, काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांसाठीच आहे, असा पुर्नरुच्चार शाहांनी केला आहे. विरोधकांच्या आरोपांवर अमित शाहांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. केजरीवाल सरकार जनताच पाडणार, विरोधक देशात संभ्रम निर्माण करत आहेत, असं शाहांनी म्हटलं आहे.  कपडे मळलेले म्हणून वॉशिंग मशीनची गरज भ्रष्टाचारी नेत्यांच्या भाजप प्रवेशावरही शाहांनी उत्तर दिलं आहे. भाजप वॉशिंग मशिन असल्याच्या मुद्द्यावर अमित शाहांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांचे कपडे मळलेले आहेत, त्यामुळेच त्यांना वॉशिंग मशीनची गरज पडते. त्यांचे कपडे मळलेले आहेत, हे त्यांनी मान्य केलं आहे. कुणी धुतलेलं नसतं, जनतेला सगळं माहित आहे, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola