Ahmedabad Bomb Blasts : अहमदाबादच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ऐतिहासिक निर्णय, 38 आरोपींना फाशी

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल ३८ दोषींना न्यायालयानं आज फाशीची शिक्षा सुनावली. अहमदाबादमधील न्यायालयानं ४९ आरोपींना दोषी ठरवलं होतं. त्यातल्या ३८ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. २६ जुलै २००८ साली अहमदाबादमध्ये तासाभरात २१ बॉम्बस्फोट झाले होते. "या प्रकरणात १३ वर्षांनी न्यायालयाचा निकाल आलाय. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणं महत्वाचं. उच्च न्यायालयानं कायम करणं महत्वाचं" असं अ‍ॅड उज्ज्वल निकम म्हणतात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola