Ahmedabad Bomb Blast प्रकरणी निकाल, 49 आरोपी दोषी, 28 जण निर्दोष
Continues below advertisement
अहमदाबादमध्ये २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील ७७ आरोपींपैकी ४९ आरोपींना गुजरातमधील विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. तर २८ आरोपींना निर्दोष ठरवलं आहे. २६ जुलै २००८ रोजी अवघ्या तासाभरात २१ स्फोटांनी अहमदाबाद शहर हादरलं होतं. त्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे २०० लोक जखमी झाले होते. आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. अखेर १३ वर्षांनी या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला. त्यात ४९ आरोपींनी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
Continues below advertisement