Loksabha : अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावरून संसदेत आजही गदारोळ ABP Majha

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला. चौधरींच्या वक्तव्यावर सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदारांनी आजही केली. चौधरी यांनी माफी मागितली आहे असं उत्तर काँग्रेसच्या खासदारांनी दिलं खरं, पण भाजप मात्र सोनिया गांधी यांनी माफी मागावी या मागणीवर ठाम आहे. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं होतं. अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचा उल्लेख 'राष्ट्रपत्नी' असा केल्यानं हा वाद सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola