Adar Poonawalla : लसीसाठी भारतातील काही मुख्यमंत्री आणि उद्योगपतींचे धमकीचे फोन येतात : अदर पुनावाला
सीरम इन्स्टिट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ब्रिटनच्या द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की आम्हालाच सर्वात अगोदर लस मिळावी या मागणीसाठी गेल्या काही दिवसात त्यांना देशातल्या पॉवरफुल लोकांचे सतत फोन येतात, त्यात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. अनेक उद्योग समूहांचे प्रमुख आहेत, आणि इतर श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. त्या फोन कॉल्सचं स्वरुप कधी कधी धमक्यांचंही असतं. मार्टिन फ्लेचर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सीरमतर्फे लवकरच देशाबाहेर लशीची निर्मिती कऱण्याचे प्लॅन्स असल्याचीही माहिती दिलीय. अदर पुनावाला हे सध्या ब्रिटनमध्ये आहेत.
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine COVID Vaccine Covishield Adar Poonawala Martin Fletcher The Times