Adar Poonawala : भारतात आणखी काही काळ लसीचा तुटवडा जाणवेल : अदर पुनावाला

Continues below advertisement

Covid-19 Vaccine Shortage  : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी भारतीय प्रशासन आग्रही दिसत आहे. किंबहुना त्यासाठी पावलंही उचलण्यात येत आहेत. असं असतानाच आता देशात लसींचा मात्र तुटवडा जाणवू लागला आहे. देशात परदेशी लसींचीही आयात करण्यात येत आहे. असं असलं तरीही देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीनं मात्र हा पुरवठाही पूरेसा नाही हेच चित्र स्पष्ट होत आहे. याचदरम्यान, कोवीशिल्ड लस निर्मिती करण्याऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदर पूनावाला यांनी आणखी काही काळ लसींचा तुटवडा अशाच पद्धतीनं जाणवत राहिल असं सूचक वक्तव्य केलं आहे. 

सध्याच्या घडीला एका दिवसाला 6- 7 कोटी लसींच्या निर्मितीचा आकडा जुलै महिन्यातच 10 कोटींवर पोहोचू शकेल अशी वस्तूस्थितीही त्यांनी मांडली. मागणी कमी असल्यामुळं याआधी कंपनीनं लसींचं प्रमाण वाढवलं नवंहतं. ज्यामुळंच जुलै महिन्यापर्यंत लसींचा तुटवडा हमखास जाणवण्याची चिन्हं आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram