अभिनेत्री जुही चावलाची 5G विरोधातील याचिका फेटाळली, पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगत 20 लाखांचा दंड

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत तिने न्यायालयाचं दारही ठोठावलं. जुही चावलाने भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही 5G विरोधातील याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली आहे. ही याचिका पब्लिसीटीसाठी असल्याचं सांगत जुही चावलाला कोर्टानं 20 लाखांचा दंड  ठोठावला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola