पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत व्यावसायिकाला 53 लाखांचा गंडा, आरोपी मांत्रिकाला बेड्या
Continues below advertisement
पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका व्यापाऱ्याला तब्बल 52 लाख रुपयांनी गंडा घालण्यात आलाय. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पुणे पोलिसांनी या मांत्रिकाला जालन्यातून अटक केली. पोलिसांचे पथक जेव्हा या मांत्रिकाच्या घरी पोहोचलं तेव्हा तुझ्या मांत्रिकाच्या घरात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी एकत्र करून ठेवलेल्या लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांना सापडल्या.
Continues below advertisement