ENBA Award | ईएनबीए अवॉर्ड सोहळ्यात एबीपी माझाचा डंका; मानाचे पुरस्कार पटकावले

ईएनबीए पुरस्कार सोहळ्यात यंदाही एबीपी न्यूज नेटवर्कचा डंका पहायला मिळाला. पुरस्कार सोहळ्यात एबीपी माझाच्या 'माझा शिक्षण परिषद' आणि एका बातमीला सर्वोत्तम न्यूज कव्हरेजसाठी सन्मान करण्यात आला आहे. आज दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर एबीपी माझाच्या प्रसन्ना जोशी यांना वेस्टर्न रीजन गटात बेस्ट अँकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

 

यंदा ईएनबीए पुरस्कार सोहळ्यात एबीपी माझाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. एबीपी माझाच्या 'माझा शिक्षण परिषद' या कार्यक्रमाचा करंट अफेअर्समधील (वर्तमानकालीन घडामोडी) सर्वोत्तम कार्यक्रमासाठी ईएनबीए सुवर्ण पुरस्कारानं गौरवण्यात आले. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होणार? त्यांच्या भविष्याची दिशा कशी असेल यासाठी तज्ञांना घेऊन या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली होती. या कार्यक्रमामुळे अनेक पालक, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola