Delhi : आम आदमी पार्टीचा आमदार नाल्यात उतरला, सफाई करत तुंबलेला कचरा काढला बाहेर

Continues below advertisement

राजकारण्यांनी ठरवलं तर ते खऱ्या अर्थानं नायक बनू शकतात.... याचा प्रत्यय दिल्लीत आला... दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार हसीब उल हसन हे शास्त्री पार्क भागातल्या एका नाल्यात चक्क सफाईसाठी उतरले... छातीपर्यंत उंच असलेल्या या गटाराच्या पाण्यात उतरून त्यांनी खोऱ्यानं नाल्यात तुंबलेला कचरा बाहेर काढला.. आमदारानंच असं काम केल्यानंतर त्याचं कौतुक झालं नसतं तरच नवल होतं. तिथे उपस्थित असलेल्या मनोज त्यागी यांनी त्यांना चक्क दुधाचा अभिषेक घातला. अनिल कपूरच्या नायक सिनेमाप्रमाणे हे दृश्यं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram