Gujarat मधून आणलेली सिंहाची जोडी संजय गांधी उद्यानात आणणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान आता आणखी वाढणार आहे... कारण गुजरातमधून मुंबईत दाखल झालेल्या सिंहाच्या जोडीला आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सोडलं जाणार आहे.. आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता ही सिंहाची जोडी नॅशनल पार्कमध्ये सोडली जाईल... सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली... हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन व्षे वयाचे आहेत. मुंबईतील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला होता. आता मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात त्यांना सोडण्यात येणार आहे. हे सिंह उद्यानात दाखल झाल्यानंतर येथील बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार आहे. भारतीय स्टेट बँकेने हे सिंह देखभालीसाठी दत्तक घेतले आहेत.