अमेरिकेत सुरु झालेल्या 5-जी सेवेमुळं विमान कंपनीच्या नेव्हिगेशन यंत्रणेत व्यत्यय ABP Majha
Continues below advertisement
आपण सर्वच ५-जी नेटवर्कची वाट पाहतोय.. मात्र अमेरिकेत ५जी सेवा सुरु होताच पहिला साईड इफेक्ट समोर आलाय.. अमेरिकेतल्या विमानतळांवर ५ जी इंटरनेट सेवा कालपासून सुरू झाल्यानं विमान सेवेत मोठा व्यत्यय निर्माण झालाय. एअर इंडियाकडून अमेरिका आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या अनेक फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्यात. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या मतानुसार ५जी लहरींमुळे विमानाचं अल्टीमीटर इंजिन आणि ब्रेक्स सिस्टीम्समध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे रनवेवर विमान उतरताना अपघात होण्याची शक्यता आहे. या सूचनेमुळे एअर इंडियानं विमानाच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement