5G Network : Vodafone च्या ग्राहकांना 5G मिळणार का? 4G मोबाईलमध्ये 5G मिळणार? सर्व प्रश्नांची उत्तरं
abp majha web team
Updated at:
02 Oct 2022 01:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App5G services : आजपासून देशात 5G इंटरनेट सेवेची (5G Internet Service) सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022) 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करण्यात आला. 5G मुळे इंटरनेटचा वेग वाढणार आहे. तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने ( FICCI ) 5G हा देशाच्या आर्थिक प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.