Suicide : कोरोना काळात व्यापाऱ्यांच्या आत्महत्येत वाढ, 2020साली 11,716 व्यापाऱ्यांनी संपवलं जीवन

Continues below advertisement

देशात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करतात, पण कोरोना काळात शेतकऱ्यांपेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालात ही आकडेवारी समोर आलीय. या आकडेवारीनुसार 2020 मध्ये 11 हजार 716 व्यापारी आणि उद्योजकांनी आत्महत्या केली. तर या काळात 10 हजार 677 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये उद्योजकांच्या आत्महत्यांमध्ये 29 टक्क्यांनी वाढ झालीय. तर व्यापाऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये जवळजवळ 50 टक्क्यांनी वाढ झाली. कोरोना काळात व्यापाऱ्यांभोवतीही आर्थिक संकटाचा फास आवळला गेल्याचं या आकडेवारीवरून दिसून येतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram