Ind Vs Pak Tention : 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमोमध्ये चर्चा होणार, शस्त्रसंधी लागू

Ind Vs Pak Tention : 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमोमध्ये चर्चा होणार, शस्त्रसंधी लागू

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दोन्ही देशांमधील दीर्घ चर्चेनंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.

"अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर, मी आनंदाने जाहीर करतो की भारत आणि पाकिस्तानने तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा  आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया 

विदेश मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी म्हणाले,  पाकिस्तानच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना 15.35 वाजता फोन आला. दोन्ही बाजूंकडून फायरिंग, लष्करी कारवाया, हवाई आणि सागरावरुन होणाऱ्या कारवाया आज 5 वाजल्यापासून थांबवल्या जातील. डीजीएमओ 12 मे रोजी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola