Gokul Milk Rate : गोकुळच्या दुधाच्या किंमतीत वाढ, गाईचं दूध 3 रुपयांनी वाढलं
Gokul Milk Rate : वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झालीये.. गोकुळ दूध संघाने दूध दरात पुन्हा एकदा वाढ केलीये.. या दूध दरवाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. गायीच्या दूधामध्ये गोकुळने ३ रुपयांची वाढ केलीये... त्यामुळे गोकुळचं दूध प्रतिलिटर ५४ रुपयांवर पोहचलंय. दरम्यान आजपासून दरवाढ लागू करण्यात आलीेय..