Fuel Rates Hike | मुंबईत पेट्रोल 96 रुपयांवर, शंभरीपासून 4 रुपये दर, सलग नवव्या दिवशी दरात वाढ
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा चढता आलेख खाली उतरताना दिसत नाही. देशात सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 89.54 रुपयांवर पोहोचली आहे आणि एक लिटर डिझेलची किंमत 79.95 रुपयांवर पोहोचली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 100.07 रुपये दराने विकले जात आहे.
Tags :
Randeep Surjewala Diesel Rate Petrol-Diesel Central Government Diesel Petrol Petrol Pump BJP Modi Government Petrol Rate Congress