Lockdown in Mumbai? मुंबईत कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर स्थानिक पातळीवर लॉकडाऊन करणार!

मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागलाय. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी मुंबईकरांनी नियमांचं पालन करणं गरजेचं झालंय. असं असतानाही अनेकजण कोरोना गेला अशा आविर्भावात वावरताय. अशाच बेजबाबदार मुंबईकरांना पालिकेनं दणका दिलाय. मुंबईत मास्क न घालणाऱ्या नागरिकांविरोधात पालिकेने कारवाई आणखी तीव्र केलीय.. मुंबईत मास्क न वापरणाऱ्या तब्बल 13 हजार जणांवर पालिकेनं केलीय. या कारवाईतून पालिकेनं तब्बल 25 लाखांचा दंड वसूल केलाय. तर लोकल प्रवासात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पालिकेनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. लोकलमध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिका विशेष मार्शल नेमण्याच्या तयारीत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola