Kolhapur | कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून मोठा तणाव, पुतळा हटवण्याची प्रक्रिया सुरू
कोल्हापूरमधील बांबवडे गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मोठा तणार निर्माण झाला आहे. मध्यरात्री अज्ञातांनी हा पुतळा बसवला, प्रशासनाने विचारणा केली असता कुणीही समोर आलं नाही, मात्र पुतळा हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिवभक्तांनी हा पुतळा हलवू देणार नाही अशी भूमिका घेतली. दुसरीकडे पोलिसांनी या पुतळ्याभोवती कडं तयार केलं आणि पुकळ्याचं रक्षण केलंय. आम्हाला अटक जाली तरी चालेल पण आम्ही पुतळा हटवू देणार नाही असा हट्ट शिवभक्तांनी धरला आहे.