January महिन्यात सरकारनं वाढवलेले Alcohol sales परवान्याचे दर कमी करण्याचा निर्णय : ABP Majha

Continues below advertisement

जानेवारी महिन्यात सरकारनं वाढवलेले मद्यविक्री परवान्याचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. जानेवारी महिन्यात या परवाना शुल्कात सरकारनं १५ ते १०० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.. मात्र त्यानंतर मद्यविक्रेत्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सरकारला दिला होता. मद्य विक्रेत्यांच्या या विरोधानंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा केली. कोरोना काळात झालेलं नुकसान पाहता नवे वाढीव परवाना दर परवडणारे नसल्याचं या विक्रेत्यांनी सांगितलंय त्यानंतर सरकारनं सुधारित परिपत्रक काढत परवाना शुल्कात सरसकट केवळ 10 टक्के वाढ करत असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवलं आहे. त्यामुळे मद्यविक्रेत्यांसमोर सरकार नरमलं की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram