Nagpur Heat wave : पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट, तापमान 42 अंशाच्यावर राहणार
Nagpur Heat wave : आजपासून पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट आहे. हवामान विभागानं यासंदर्भातील अलर्ट जारी केला आहे. या चार दिवसात विदर्भातील तापमान 42 अंशाच्या वर राहणार आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमान खाली आलं होतं. मात्र, आता ढगाळ वातावरण निवळल्यानं राजस्थान कडून येणारे उष्ण वारे थेट विदर्भापर्यंत येऊ लागले आहेत.