MIM Mumbai Rally : काही क्षणात जलील यांचा ताफा चांदिवलीत सभास्थळी दाखल होणार : ABP MAJHA
Continues below advertisement
मुस्लिम आरक्षण, वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि इतर मागण्यांसाठी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमची रॅली (AMIM Rally) औरंगाबादहून मुंबईच्या ( Aurangabad to Mumbai) दिशेनं निघाली होती. दरम्यान या भव्य रॅलीला मुंबईत प्रवेश मिळणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मुंबईत रॅली सभांना बंदी असल्यानं एमआयएम कार्यकर्त्यांना मुंबई बाहेर रोखण्यासाठी पोलीसांनी मुंबईच्या वेशीवर बॅरिकेडींग केलं होतं. पण अखे खासदार इम्तियाज जलील हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह वाहनांचा ताफा घेऊन वाशीच्या पुढे मानखुर्दपर्यंत पोहोचले आहेत. काही वेळातच सर्व ताफा चांदिवलीत दाखल होणार आहे. त्यामुळे आज (शनिवारी) सायंकाळी चांदीवली येथील एमआयएमची सभा होणारचं असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement