Prashna Maharashtrache इम्तियाज जलील यांनी शिवसेनेत यावं, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांची ऑफर

Continues below advertisement
मुंबई : धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना नेते, राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात खडाखडी पाहायला मिळाली. दोघेही एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्राचे' या कार्यक्रमात बोलत होते. सरकारला जागं करण्यासाठी मी मंदिरं, मशिदी खुली करण्याची मागणी केली. लोकांना जागृत करण्यासाठी मी मंदिरं, मशिदी खुली करण्यासाठी आंदोलन केलं. एमआयएम पक्षाचा मुस्लीम खासदार मंदिरं खुली करण्याची भूमिका मांडतो, याचं स्वागत होईल असं मला वाटलं होतं. जात-धर्माचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मला केलेला विरोध निंदनीय होता. मंदिरं, मशिदी उघडणे गरजेचं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram