Tree Ganesha | गणेशमूर्तींचं घरीच विसर्जन करा आणि एक झाड लावा, किरण देवरेंनी साकारला वृक्ष गणेश!
मुंबईत नागरिकांना गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी यंदा समुद्रात जाता येणार नाही. यंदा गिरगाव परिसरातील नागरिकांना ऑनलाईन विसर्जनासाठीची वेळ घेऊन पालिकेने दिलेल्या वेळेत बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी जावं लागणार आहे. यंदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेकडून ही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासोबतच यंदा गिरगाव चौपाटीवर तब्बल 300 टेबल लावण्यात आले आहेत. या टेबल जवळ महापालिकेचे कर्मचारी असणार आहेत. त्यांच्याकडे यंदा नागरिकांना बाप्पाला सुपूर्द करावं लागणार आहे. त्यानंतर पालिकेचे कर्मचारी बाप्पाचं विधिवत विसर्जन करणार आहेत. मात्र बाहेर न पडता घरच्या घरीच बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करणं अधिक मदतीचं ठरेल, यासाठी मूर्तिकार किरण देवरेंनी एक सुंदर कल्पना मांडलीय. पर्यावरणपूरक अशी बाप्पाची मूर्ती त्यांनी साकारत र्तीचं विसर्जन घरीच करून एक झाड लावण्याची ही त्यांची युक्ती आहे!