Bacchu Kadu | मी शिवसेनेसोबतच राहणार, कोणतीही शंका नसावी- बच्चू कडू | ABP Majha
निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. परंतु गेल्या काही दिवसांत राज्यातली सत्तेची समीकरणं बदलली आहेत. काही पक्षांकडून आमदार फोडण्याचा, लहान पक्षातील आमदारांना, अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत आमदार बच्चू कडू मात्र अद्याप शिवसेनेसोबतच आहेत. याबाबत कडू यांनी स्वतःच एबीपी माझाला माहिती दिली.