Pankaja Munde EXCLUSIVE | कोरोनाच्या संकट काळात राजकारण करण्याची गरज नाही - पंकजा मुंडे
Continues below advertisement
मुंबई : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यावरचं कोरोनाचं संकट, विधानपरिषद निवडणूक अशा विविध विषयांवर भाष्य केलं. गोपीनाथ गडावर जायला परवानगी मिळाली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर एकत्र येऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
लोकांनी एकत्र येऊ नये, त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. जिथे असाल तेथून गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिवादन करा. फेसबूक, सोशल मीडियाच्या माध्यमातून गोपीनाथ गडावरील कार्यक्रम दाखवला जाईल. मुंडे साहेबांच्या आठवणीत स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने दोन दिवे घरात लावा. तसेच कोरानाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजू लोकांना मदत करा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

Tags :
Pankaja Munde Video Panakaja Munde Appeal Corona Crisis Marathwada Water Issue Gopinath Munde Beed Pankaja Munde BJP