Raj Thackeray | छापून आलेली बातमी पूर्णपणे खोटी,रो-रो बोटी वर ना सिगारेट ओढली ना दंड भरला- राज ठाकरे
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे त्यांना एक हजार रुपयांचा दंड भरला असल्याची बातमी काही वृत्तपत्र आणि चॅनेलने चालवली होती. मात्र, प्रसारित आणि छापून आलेल्या बातम्या खोट्या असल्याची माहिती राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे. राज ठाकरे म्हणाले ‘बातमी पूर्णपणे खोटी असून असा कोणताही प्रकार घडला नाही’
Continues below advertisement