Men Harassment | लॉकडाऊनच्या काळात बायकोकडून नवऱ्याचा छळ, तक्रारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
पत्नीनं केलेल्या छळात महाराष्ट्र चक्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुरुषांवर होणाऱ्या छळाबाबत तर देशभरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत आणि लॉकडाऊनमध्ये त्या तक्रारींचं प्रमाण वाढलंय. लॉकडाऊनच्या काळात बायकोकडून नवऱ्याचा छळ होण्याचे बरेच प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रातून 9 हजार 809 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारदारांमध्ये 25 ते 45 वयोगटातील पुरुषांची संख्या अधिक आहे.