Rajasthan Politics ज्योतिरादित्यंनंतर सचिन पायलटही भाजपच्या वाटेवर? सचिन पायलटांची नाराजी दूर होणार?

जयपूर : राजस्थानच्या सत्तासंघर्षात एक मोठी घडामोड घडली आहे. राजस्थानमधील अशोक गहलोत यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन पायलट यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात 30 आमदारांचं त्यांना समर्थन असल्याचंही म्हटलं आहे. तसेच सोमवारी होणाऱ्या काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. त्यामुळे राजस्थानमधील सरकार अल्पमतात असून सत्तांतर होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र सचिन पायलट यांच्या सोबत असलेले 30 आमदार कोण आहेत याची माहिती त्यांनी दिलेली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola