सिंधुदुर्गात शेकडो मच्छिमार महिलांचं आक्रोश आंदोलन, रोखीनं पॅकेज देण्याच्या मागणीसाठी आंदोलन

Continues below advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये जिल्हा मच्छ व्यवसाय उपायुक्त कार्यालयासमोर शेकडो मच्छीमार महिलांच आक्रोश आंदोलन सुरू. मच्छीमार महिलांना सरसकट रोखीने पॅकेज द्यावे या मागणीसाठी जिल्हाभरातील मच्छीमार महिला मालवण मधील मच्छ कार्यालयासमोर एकवटल्या. सिंधुदुर्ग जिल्हा मच्छ व्यवसायीक महिला विविध सेवा सहकारी संस्था मार्फत आज सिंधुदुर्ग जिल्हा मच्छ व्यवसाय उपायुक्त कार्यालय मालवण येथे विविध मागण्यां घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1000 ते 1200 महिला एकत्रित आल्या. शासनाने मच्छीमारासाठी जाहीर केलेल्या पॅकेज साठी जाचक अटी असल्याने त्या अटी शिथिल कराव्यात अन्यथा न्याय हक्कासाठी व्यापक लढा उभारू अशी प्रमुख मागणी घेऊन या मच्छीमार महिलांच आक्रोश आंदोलन सुरू आहे. या महिला मच्छीमारानी याअगोदर निवेदन देऊन सुद्धा आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज जिल्ह्यातील मच्छीमार महिला मालवण मध्ये एकवटल्या असून आक्रोश आंदोलन करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram