गुन्हे दाखल झालेल्या भाजप नेत्यांनी आधी राजीनामा द्यावा,यशोमती ठाकूर यांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज एक दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा अनेक पत्रकारांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पोलीस मारहाण प्रकरणात तीन महिन्याची शिक्षा सुनावली आणि आता यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजप आंदोलन करत आहे. पण अमरावती जिल्ह्यात ही तुमच्या भाजपवर गुन्हे दाखल आहे मग तुम्ही त्यांचा राजीनामा का मागत नाही असा प्रश्न विचारला तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिल्यावर मग एका पत्रकारांनी गृहमंत्री अमित शहावर प्रश्न विचारताच पत्रकार परिषद सुरू असताना चंद्रकांत पाटीलांनी एकेरी बोलत 'तू असेल नसेल बोलू नको' अस म्हटले.