मुंबई पॉवरकटने हैराण, मग शेतकऱ्यांचं काय होत असेल मुंबईकरांनो? 8तास लोडशेडिंग झेलणाऱ्यांचं मत ऐका

मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे ठप्प झाली, घरे आणि कार्यालायातील वीज गायब झाली, दमट हवामानात लोक अक्षरश: घामाघूम झाले...काही काळ ही अवस्था होती मुंबईची. सोमवारी सकाळी अचानकपणे मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. अचानकपणे संपूर्ण मुबंईची एकाचवेळी वीज खंडित झाली हे इतिहासात पहिल्यांदाच घडत होते. तिन्ही मार्गाच्या लोकल सेवा ठप्प झाल्या. या लोकल सेवा अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात येत आहेत. सर्व खासगी कार्यालयांसह शासकीय कार्यालयेही बंद झाली. न्यायालयाचेही कामकाज काही वेळेसाठी बंद झाले. रस्त्यावरचे सिग्नल व्यवस्थाही थांबली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola