Special Report | स्कूल बस चालकांचे लॉकडाऊनमुळे हाल, शाळा बंद असल्याने सहा महिन्यांपासून उत्पन्न बंद
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद झाले. त्याचप्रमाणे शाळा देखील बंद झाल्या. याचा परिणाम विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह स्कूल बस चालकांवर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अधिक वेळ स्कूल बसेस एकाच जागी थांबून आहेत. उत्पन्नाचं दुसरं कोणतं साधन नसलेल्या या बसचालकांकडे फायनान्स आणि बचत गट पैशांसाठी तगादा लावत आहेत.
Tags :
School Closed Solapur Special Report Maharashtra Lockdown Unemployment School Bus Special Report Lockdown Solapur Corona