#Nashik झाकीर हुसेन रुग्णालयात नातेवाईकालाच मृतदेह घेऊन जाण्यास भाग पाडलं,नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Continues below advertisement

नाशिकसारख्या प्रगत शहरात आरोग्य व्यवस्था नावाला तरी उरली आहे का असा सवाल उपस्थित होतोय. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तर असंवेदंशीलतेचा कळसच गाठला आहे. महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार दरम्यान  एक करोना बाधित महिलेचा गुरुवारी  मृत्यू झाला मात्र या महिलेचा मृतदेह वॉर्डमधून रुग्णवाहिका आणि तिथून पुढे स्मशानभूमी पर्यन्त घेऊन जाण्याची वेळ नातेवाईकांवरच आली. रुग्णालयात कर्मचारी नाही. एकच वॉर्ड बॉंय आहे त्यामुळे तुम्हीच तुमच्या रुग्णाचा मृतदेह घेऊन जा असे फर्मान सोडले आणि त्यामुळे नातेवाईकांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच पीपीई किट परिधान करावे लागले. त्यानंतर स्वत:ला सावरत, ppe  किट सांभाळत मृतदेह न्यावा लागला. या निमित्ताने महापालिकेच्या ढिसाळ, बेजबाबदार आणि असंवेदनशील कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram