Holi Rules : होळीसाठी गृहखात्याची नियमावली प्रसिध्द, रात्री दहाच्या आत होळी दहन करावी लागणार
राज्याच्या गृह खात्यानं होळीसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे.. रात्री दहाच्या आत होळीचं दहन करणं बंधनकारक असणार आहे.. होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी असेल.. तसंच मद्यपान आणि बीभत्स वर्तन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.. जबरदस्तीनं रंग लावू नये आणि पाण्याचे फुगे फेकू नये अशा गृह खात्यानं सुचना दिल्यात.