Special Report Hingoli Farmer : हिंगोलीत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं अवयव विक्रीचं रेटकार्ड
कधी पाऊस झोडपून काढतो, कधी दुष्काळ होरपळून काढतो... तर कधी शासन-प्रशासनाचं दुर्लक्ष त्यांच्या मुळावर उठतं... ही चित्तरकथा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली... आणि त्यात भरीस भर म्हणून बँकांचा वसुलीसाठीचा तगादा वेगळाच... याच सगळ्या त्रासाला कंटाळून, हतबल झालेल्या काही शेतकऱ्यांनी आपले अवयवच विकायला काढलेत... त्यामुळे, आपल्या सगळ्यांच्या ताटाला आणि पोटाला सुखाचा घास बहाल करणाऱ्या अन्नदात्यावर ही कसली वेळ आलीय... बघा...