Santosh Banger : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल
प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्यांना आमदार बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली... बांगर यांच्या कार्यकर्त्यांनींही प्राचार्यांचे कान पकडत त्यांना मारहाण केली होती.. तसंच महाविद्यालयातील ५ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मारहाणीनंतर तब्बल दहा दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय