Pradnya Satav Attack : आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरीमध्ये हल्ला करणारी व्यक्ती ताब्यात
Continues below advertisement
दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झालाय... हिंगोलीच्या कसबे दवंडा गावात एका अज्ञाताने त्यांच्यावर हल्ला केला... स्वत: प्रज्ञा सातव यांनी फेसबूक पोस्टद्वारे ही माहिती दिली... या प्रकरणी हिंगोलीतील आखाडा बाळापूर पोलिसांनी हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेतलंय... तर सातव यांच्या तक्रारीवरून हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय... दरम्यान मला राजकाराणापासून दूर ठेवण्यासाठी काहींनी हे कृत्य केलं असल्याचा संशय सातव यांनी व्यक्त केलाय... त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी
Continues below advertisement