Hingoli Rain : हिंगोलीतही परतीच्या पावसाने सोयाबीनसह कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

दिवाळीच्या तोंडावर राज्याच्या विविध भागात झालेल्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलाय. परतीच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय.. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांना पावसाने झोडपलं... या पावसामुळे शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे काढणीला आलेलं सोयाबीन, उडीद, मका मातीमोल झालंय.. कापूस आणि द्राक्षाचं नुकसान झाल्यानेही शेतकरी धास्तावलाय.. एकाच पावसाळ्यात तीन वेळा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.. हे नुकसान सहन करत असताना आगामी काळात त्याला पिकाच्या भावासाठी झगडावं लागणार आहे.  त्यामुळे पाऊस जरी वैऱ्यासारखा वागत असला तरी मायबाप सरकारने शेतकऱ्यांचं कैवारी बनावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola